Thu. Sep 29th, 2022

राज्यात चार ते पाच दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई, उपनगरांसह लागून असलेल्या जिल्ह्यांत पाऊसाने मुक्काम ठोकला आहे . शनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे. रविवारी दुपारी पावसाने उसंत घेतल्याने लोकल सेवा पूर्ववत झाली होती. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस सुरु असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.
संपूर्ण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे आणि रायगड येथे पुढील ३ ते ४ तासाच्या दरम्यान तीव्र ते अति तीव्र पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आणि काही भागांत डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.