Tue. Aug 9th, 2022

‘अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी शिवसेना प्रयत्नशील’

आदित्य ठाकरे आयोध्येला गेले आहे. तिथे त्यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. ‘आज आमची तिर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. राम मंदिर निर्माण होतंय हे पाहून शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. रामराज्य आणण्यासाठी रामलल्लांचं दर्शन घेतलंय. जनतेला दिलेलं वचन पाळणं हेच आमचं हिंदुत्व आहे. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहेत. योगी सरकारशी पत्रव्यवहार देखील करणार आहेत’, अशी महत्त्वपूर्ण माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, युवासेना नेते वरुण सरदेसाई, दीपाली सय्यद उपस्थित आहेत. राम मंदिर निर्माण होतंय हे पाहून शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. रामराज्य आणण्यासाठी रामलल्लांचं दर्शन घेतलंय. जनतेला दिलेलं वचन पाळणं हेच आमचं हिंदुत्व असल्याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली.

‘साधारणपणे १०० खोल्यांचं किंवा जास्ती जमेल असं प्रशस्त खोल्याचं ‘महाराष्ट्र सदन’ बनवायचं आहे. त्यांना राहण्यासाठी इथे चांगली जागा निर्माण करायची आहे. कारण महाराष्ट्रातून खूप लोक अयोध्येत येत असतात. अयोध्येत महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही योगींशी बोलणार आहोत. तसेच त्यासाठी पत्रव्यवहार देखील करणार आहोत’, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.