आजपासून राज्यातील बहुतांश भागातील शाळांना सुरुवात
विदर्भात ८ तर मराठवाड्यात ५ जिल्ह्यात शाळा सुरु

अखेर शाळेची घंटा वाजली आहे. आजपासून राज्यातील बहुतांश भागातील शाळांना सुरुवात झालेली आहे. विदर्भात ८ तर मराठवाड्यात ५ जिल्ह्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. अमरावती, कोल्हापूर, सातारा,सांगली, सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरु झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामिण भागातही देखील शाळा सुरु केल्या गेल्या आहेत. यासाठी शाळा देखील सज्ज झाल्या आहेत, खबरदारी घेत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
शाळा सुरू होताना मात्र पालकांना आपल्या पाल्यासाठी एक संमतीपत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचं की नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.