Sun. Sep 19th, 2021

‘आम्हीही बघून घेऊ’; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा इशारा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभर सक्तवसुली संचलनालयाकडून त्यांच्या नागपूर आणि मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, शनिवार त्यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावला आहे. देशमुखांना आज चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

‘कालच बघितलं की, घरांवर आणि कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. शरद पवार यांनी कालच सांगितलं की, निराशेतून हे केलं जात आहे. काही लोकांच्या मनात निराशा आहे. सरकार बनवू शकलो नाही, या अपयशामुळे नैराश्य आलेलं आहे. सरकारमध्ये असलेल्या पक्षातील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. महाराष्ट्रातील मंत्री असोत, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार असोत, किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमदार असतेत, सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आम्ही बघून घेऊ’, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

तसेच, ‘देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनण्याची तयारी सुरू आहे. पण ही आघाडी काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस असल्याशिवाय विरोधी पक्षांची आघाडी आकार घेऊ शकत नाही. शरद पवार यांचंही असंच म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनंही हेच म्हटलेलं आहे’, असं राऊत म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *