Sat. Nov 27th, 2021

आधी कश्मीर नंतर मंदीर – सेनेचा नवीन नारा

युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेनं  नवीन नारा सुरु केला आहे.

आधी कश्मीर नंतर मंदीर असे शिवसेनेच्या नवीन नाऱ्याचं मुख्यपत्र सामनाच्या अग्रलेखातून दिले आहे.

यादरम्यान शिवसेनेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरात सूर मिसळले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर राममंदिराचा मुद्दा बाजूला ठेवून काश्मीरचा प्रश्न सोडवावा.

यासाठी देशात सुव्यवस्थित आणि भक्क्म सरकार असावं, अशी इच्छा शिवसेनेनं व्यक्त केली.

शिवसेनेनं  निशाणा बदलला

  • राज्यात युती अगोदर भाजपावर पकड धरणाऱ्या शिवसेनेनं आपला निशाणा बदलला आहे.
  • कश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी देशाला सुव्यवस्थित आणि भक्क्म सरकारची गरज आहे.
  • स्थिर सरकार असल्याशिवाय दहशतवादाचा नायनाट होणार नाही आणि पाकिस्तानला धडा शिकवता येणार नाही, असे मत आरएसएसने व्यक्त केले.
  • मजबूत पंतप्रधान असल्याशिवाय कश्मीरचा प्रश्न सोडविता येणार नाही.
  • यासाठी राममंदिर, समान नगरी कायदा, 370 कलम आणि विषय कुलूपबंद करून फक्त कश्मीर, पुलवामा, स्थिर सरकार याच विषयांवर जनतेने लक्ष केंद्रित करण्याची  गरज व्यक्त केली.
  • कश्मीर प्रकरणावरून सेनेने काँग्रेसला लक्ष्य केले.
  • कश्मीरी तरुण, कश्मीरची उत्पादने, पर्यटन यावर बहिष्कार टाकणे म्हणजे देशप्रेमाचे खोटे प्रदर्शन आहे, असे म्हणत शिवसेनेनं काँग्रेसला डिवचलं आहे.
  • आम्हाला कश्मीर हवे, पण कश्मीरी नको असे सांगताना चिंदबरम यांना काय म्हणायचे आहे, ते आता राहुल गांधीनीच देशाला समजून सांगावे, असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *