Thu. May 19th, 2022

राज्यातील १२वीच्या परीक्षेवर आज निर्णय होणार

राज्यातील १२वीच्या परीक्षेवर आज निर्णय होणार असून राज्य मंत्रिडळाच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

आज दुपारी ३.३० वाजता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत १२ वीच्या परीक्षेसह पदोन्नती आरक्षण, टाळेबंदी, मराठा आरक्षण, कोरोना या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना पाहिजे तसं शिक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नाशिकमधील पालक वर्गातून केली जात आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द केली खरी, पण या आधारावर पुढे जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र अद्यापही अंधारात आहे.

त्यामुळे सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात देखील आपली भूमिका मांडावी अशी मागणी नाशिकमधील पालकवर्गाकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.