Wed. Jan 19th, 2022

Maharashtra Budget 2019 : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प

विधासभेत अर्थसंकल्प मांडायला सुरुवात, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.

आजच्या अर्थसंकल्पात पुढील 4 महिन्यांच्या आवश्यक आर्थिक खर्चाची तरतूद असेल, पण यानिमित्ताने निवडणुकीच्या तोंडावर सवलतींच्या काही घोषणादेखील करण्यात येतील, अशी शक्यता आहे.

याशिवाय, चालू आर्थिक वर्षात सादर झालेल्या तब्बल 36 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि सरकारच्या डोक्यावर असलेले सुमारे 5 लाख कोटींचे कर्ज अशी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांसह विविध समाजघटकांसाठी निवडणुकीआधी काही घोषणा होऊ शकतात.

दरम्यान लोकसभा निवडणूक वर्षात अंतरिम अर्थसंकल्प मांडणारे सुधीर मुनगंटीवार हे चौथे वित्तमंत्री आहेत.

बजेट 2019

शिवाजी महाराज कर्जमाफी योजना सुरू राहणार

शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी

नाबार्डच्या सहाय्याने रस्ते विकास योजनेसाठी 350 कोटी रुपये

100 % गावांच्या विदयुतीकरणाचे लक्ष्य पूर्ण

कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विमानतळ विकास मोहिम वेगात

उत्पन्नाची मर्यादा आता 8 लक्ष

कृषीपूरक व्यवसायासाठी ५०० कोटींची तरतूद

राज्यातील रस्त्यांचा लक्षणीय विकास

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 2 हजार 164 कोटी

विविध योजनांच्या माध्यमातून शेतमाला अनुदान देणार

रस्ते विकासाठी यंदा 8 हजार 500 कोटींचा तरतूद

वीज बिलाची 5 % रक्कम सरकार देणार

दूध, कांदा, तूर, हरभरा, धान उत्पादकांना विविध योजना

पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी सरकारची मदत

जलयुक्त शिवार अभियानासाठी यंदा 1500 कोटी रूपयांची तरतूद

शिवस्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला

दुष्काळग्रस्त भागांना मदत पोहोचणार

मेक इन इंडियाच्या माध्यमातून 12 लक्ष कोटी रूपयांचे सामंजस्य करार

96 बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी खर्चाला मान्यता

बसेसची खरेदी प्रक्रियाही वेगात

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग प्रगती पथावर

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग प्रगती पथावर

शिवडी-न्हावा शेवा बंदर प्रगती पथावर

13 हजार कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची भर

सामाजिक न्यायाच्या माध्यमातून विषमतामुक्त महाराष्ट्र

शेती आणि शेतीपूरक व्यवसायला प्राथमिकता

शेततळे. सिंचन आणि विहिरींवर भर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *