देशातले महाराष्ट्र तिसरे स्वच्छ राज्य

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राने तिसरा क्रमांक मिळवला आहे. या सर्वेक्षणानुसार छत्तीसगडने पहिला क्रमांक आणि झारखंडने दुसरा क्रमांक पटकवला आहे. तसेच मध्य प्रदेशमधील इंदुर हे देशातील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान मिळवला आहे. इंदुरने हा मान सलग तीनवर्षापासून मिळवला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ –

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राचा स्वच्छतेत तिसरा क्रमांक पटकवला.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९मध्ये पहिला क्रमांक छत्तीसगडने तर दुसरा क्रमांक झारखंडने मिळवला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या निकालाची घोषणा केली आहे.

देशातील ४,२३७ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव आणि महाराष्ट्रातील स्वच्छ भारत मिशनच्या संचालक मनीषा म्हैसकर यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

Exit mobile version