कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. बाहेरुन महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी सरकारने काही निर्बंध घालून दिले आहेत. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी राज्य सरकारने अट घातली आहे. या लोकांनी दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल जवळ बाळगणे आवश्यक आहे.
तिसऱ्या कोरोना लाटेचा धोका कायम असल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा आरटीपीआर निगेटिव्ह असल्याचा अहवाल सीमेजवळ दाखवावा लागणार आहे.
परराज्यातून येणाऱ्या लोकांमुळे संसर्गचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. राज्यात शुक्रवारी ६ हजार ६८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पाच मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत ६६ डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची राज्याच्या आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे