Fri. Sep 30th, 2022

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणास सुरुवात होत असून शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या नियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित करण्यात आला आहे.

शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ऑनलाईन, तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनदेखील करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.