Sat. Jun 19th, 2021

ताडोबा पर्यटनाला येणार नवं रूप

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यभरात पर्यटनाचा प्रचार करण्यात येतो. पर्यटकांना उत्तम अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नागपूर व वर्धा येथील रिसॉर्टचे नूतनीकरण करणार आहे.

नागपूर या संत्र्यांच्या शहरात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. दीक्षाभूमी, अदासा गणेश मंदीर, सीताबर्डी किल्ला, फुटाला तलाव, अंबाझरी, जामा मशीद, मिहान कार्गो हब, शून्य मैल आणि ड्रॅगन पॅलेस मंदीर अशी अनेक ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे या ठिकाणी आहेत. या ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटक वर्षभर नागपूरमध्ये येत असतात. या पर्यटन स्थळांव्यतिरिक्त या शहराला हरितकिनार लाभली आहे आणि या शहरात अनेक बागिचे व उद्याने आहेत. कस्तुरचंद पार्क, राजभवनातील जैवविविधता उद्यान इत्यादी ठिकाणी आनंदात वेळ घालवता येतो. ताडोबा हा नागपूरमधील एक समृद्ध व्याघ्रप्रकल्प आहे. ताडोबामध्ये मोहरली व पळसगावमध्ये मचाण पर्यटन सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून पर्यटकांना उत्तम सुविधा आणि दृश्ये पाहायला मिळावीत.

त्याचप्रमाणे वर्धा येथील सेवाग्राम आश्रम, बोर व्याघ्र प्रकल्प, लक्ष्मी नारायण मंदीर आणि गिराड दर्गा गेट पाहण्यासाठी पर्यटक येतात. नागपूर आणि वर्धा येथील रिसॉर्टचे नूतनीकरण केल्यास पर्यटकांना अधिक चांगला परिसर अनुभवायला मिळेल आणि येथील वास्तव्य अधिक संस्मरणीय होईल. या प्रयत्नांच्या माध्यमातून एमटीडीसी या ठिकाणचा सांस्कृतिक गाभा आणि वारसा यांचे जतन करत आहे आणि त्याला चालना देत आहे.

यावर प्रतिक्रिया देताना एमटीडीसीच्या उत्सव, प्रसिद्धी आणि जनसंपर्क विभागातील वरिष्ठ व्यवस्थापक श्री. दिनेश कांबळे म्हणाले, “आधुनिक पर्यटकांना निवांतपणा आणि हवा असतो. नागपूर आणि वर्धा येथील रिसॉर्टचे नूतनीकरण करून आम्ही पर्यटकांना आल्हाददायक वातावरण उपलब्ध करून देऊ इच्छितो. नागपूर आणि वर्धा येथील रिसॉर्टजवळच अनेक आकर्षक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे येथे येणारे पर्यटन पर्यटनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील, असा मला विश्वास आहे.

एमटीडीसीबद्दल:

पर्यटन हे राज्यातील वेगाने प्रगती करणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करणे या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) स्थापन करण्यात आले. स्थापनेपासूनच पर्यटन स्थळांचा विकास आणि देखभाल यात एमटीडीसी आघाडीवर राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी या महामंडळातर्फे रिसॉर्ट चालविण्यात येतात. पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी माहिती केंद्रे सुरू केली आहेत. या माहिती केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, तेथे जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे नकाशे, महाराष्ट्र पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका आणि पर्यटन पुस्तके वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महाराष्ट्र हे भारतातील पर्यटनाचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथे स्वच्छ सागरकिनारे, अभयारण्ये, थंड हवेची ठिकाणे, नैसर्गिक गुंफा, धबधबे, भव्य किल्ले, विविधरंगी महोत्सव, प्राचीन तीर्थस्थळे, वस्तुसंग्रहालये आणि ऐतिहासिक स्थळे आहेत.

अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी भेट द्या: http://www.maharashtratourism.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *