महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्तीगीर महासंघाने घेतला आहे. दिल्लीत ३० जून रोजी पार पडलेल्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. मात्र, ही परिषद आता बरखास्त करण्यात आल्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
राज्य कुस्तीगिर संघटनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या. तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तवाकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तसेच विनोद तोमर हे सचिव आहेत. बृजभूषण सिंह हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र, सिंह यांन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर कारवाई केल्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ही कारवाई महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळेच झाली आहे. बाळासाहेब लांडगे अध्यक्षांचासुद्धा आदेश जुमानत नव्हते, असा आरोप पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला आहे. तसेच भोंडवे यांनी लांडगे यांच्या मुलावरही आरोप केले आहेत.