Wed. Aug 10th, 2022

झोटिंग समितीचा अहवाल अखेर सापडला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे जमीन गैरव्यवहाराप्रकरणाची चौकशी करणारा झोटिंग समितीचा अहवाल अखेर सापडला आहे. भोसरी जमीन प्रकरणातला झोटिंग समितीचा अहवाल मंगळवारी गहाळ झाला होता. हा अहवाल नक्की कसा गायब झाला या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते.

भोसरी एमआयडीसीतल्या जमीन खरेदी प्रकरणामुळं राष्ट्रवादीचे नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी सुरू आहे. २०१७ मध्ये झोटिंग समितीने खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणांमध्ये चौकशी सुरु केली होती. याच मुद्द्यावरुन खडसेंना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीमार्फत त्यांची चौकशी सुरू आहे. परंतु हा अहवाल आताच कसा गायब झाला असा प्रश्न भाजपकडून विचारला जात आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारने झोटिंग समिती अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक असा दावा फडणवीस यांचाच असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.