महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. याआधीदेखील महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद पाहायला मिळाला होता. परंतु तो वाद अद्यापही मिटलेला नसल्याचं दिसून येतंय. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत हा वाद सुरु असून त्यात पेच कायम आहे. पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देखील निर्णय झाला नसल्याचं समोर आलाय. त्याचबरोबर रायगडच्या शिवसेना आमदारांना अजूनही अजित पवार भेटलेले नाही त्यामुळे अजूनही या पालकमंत्रीपदाबाबत तिढा कायम आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या पालकमंत्रीपदाचा वाद सुटण्याची महायुतीतील नेत्यांनी भूमिका व्यक्त केली होती. परंतु अद्यापही हा तिढा कायम आहे. पालकमंत्री पदाच्या संदर्भात रायगडच्या तीन शिवसेना आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी वेळ देखील मागितली होती परंतु शिवसेना आमदार आणि अजित यांच्यात अजूनही भेट झालेली नाही.
तर इकडे दुरीकडे नाशिकमध्ये देखील पालकमंत्रीपदाचा वाद पाहायला मिळतोय. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थागिती मिळाली असल्याचं देखील पाहायला मिळालं होत. त्यातच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी पालकमंत्री पदावरून मोठं विधान केलं होत. नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. सरकारकडून जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थागिती देण्यात आली. यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मोठं विधान केलं.
लवकरच नाशिकसाठी गोड बातमी ऐकायला मिळेल. पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे लवकर योग्य ते निर्णय घेतील. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दादा भुसे यांच्याकडे देण्यात येईल असं विधान त्यांनी केलं होत. नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. यावरून हा वाद उफाळला होता.
दरम्यान आता महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. याआधीदेखील महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद पाहायला मिळाला होता. परंतु तो वाद अद्यापही मिटलेला नसल्याचं दिसून येतंय.