गेल्या १३ दिवसापासून कांदा लिलाव संप सुरू आहे. काही बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू केला. महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सोमवार २ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू केले. त्यावर व्यापारी वर्गाने असे म्हंटले की, आमच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. याला वेळ लागेल असे आम्हाला लक्षात आले. पण मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत तोडगा निघाला आणि अखेर संप मागे घेण्यात आला आहे. मंगळावरपासून कांदा लिलाव जिल्ह्यात पूर्ववत होणार आहे.