Monday, October 14, 2024 02:16:39 AM

कांद्याचे लिलाव बंद

कांद्याचे लिलाव बंद

येवला, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवारपासून ते शनिवारपर्यंत दीपावली आणि साप्ताहिक सुट्ट्यानिमित्त तब्बल बारा दिवस कांदा लिलाव तर नऊ दिवस धान्य लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय लासलगाव बाजार समितीने जाहीर केला. 

धान्य विभागातील व्यापारी वर्ग हे धान्य या शेतीमालाच्या लिलावात सहभागी होणार नसल्याने सदर कालावधीत लासलगांव मुख्य बाजार आवारावरील कांदा आणि धान्य या शेतीमालाचे लिलाव बंद राहतील. तरी शेतकरी बांधवांनी आपली गैरसोय होऊ नये म्हणून वरील दिवशी कांदा आणि धान्य हा शेतीमाल विक्रीस आणू नये असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे.  


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo