Tuesday, December 10, 2024 12:27:13 AM

आदिवासी समाजाचे आमरण उपोषण

आदिवासी समाजाचे आमरण उपोषण

मनमाड, ०२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: शबरी योजनेअंतर्गत एक लाख घरकुलांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ शेकडो संतप्त आदिवासी बांधवांनी नाशिक कळवण प्रशासाकीय इमारतीसमोर डिवायएफआय संघटनेच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले. शासनाने आश्वासन देऊनही शबरी घरकुल योजनांच्या प्रस्ताव धूळ खात पडून असल्याने आदिवासी बांधवांमध्ये तीव्र रोष असून शासनाने तातडीने लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनांचा लाभ द्यावा. अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी शासनाच्या विरोधतात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo