छत्रपती संभाजीनगर, ०४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे शहरातील २. २८ लाख कुटुंबाच मराठा सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. महापालिकेत १.७२ लाख कुटुंबाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ५६ हजार अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण महापालिकेच्या पथकाने पूर्ण केलय. हे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने १ हजार ७२५ प्रगनक, ११५ सुपरवायझर, २५० कर्मचारी आणि शिक्षक हे नियुक्त करण्यात आले होते.
महत्त्वाचे मुद्दे -
- छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा सर्वेक्षण पूर्ण
- शहरात २.२८ लाख कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण