नाशिक , ७ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या वडाळीभोई येथील उड्डाण पुलावर सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली,त्यामुळे या मार्गावरील एका बाजूची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली होती.ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच सोमा टोल कंपनीचे अग्निशामक पथक आणि टोल कर्मचा-यांनी दोन तास प्रयत्न करुन आग विझवून वाहतूक सुरळीत केली. सदर घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.