Sunday, December 01, 2024 11:57:41 PM

गॅरेजमधील १७ चारचाकी वाहनांना आग

गॅरेजमधील १७ चारचाकी वाहनांना आग

पुणे, दि. १५ मार्च, २०२४, प्रतिनिधी : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात मोकळ्या मैदानात असलेल्या गवताला आग लागल्याची घटना पहाटे घडली. अग्निशमन दल नियंत्रण कक्षाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द इथे दोन टँकर तातडीने रवाना करण्यात आले होते. बाजूलाच असलेल्या गॅरेजमधील १७ चारचाकी गाड्यांनाही आग लागल्याचे निदर्शनास येताच चारही बाजूने पाण्याचा मारा करत अर्ध्या तासातच आग आटोक्यात आणण्यात आली. आगीच्या घटनेत कोणीही जखमी किंवा जिवितहानी झालेली नाही.

              

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo