Friday, November 14, 2025 08:08:19 AM

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला आचारसंहिता आडवी येणार

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला आचारसंहिता आडवी येणार

अहमदनगर, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी सध्या कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी, या शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभागाच्या आदेशाला बगल देत प्राथमिक शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या शिक्षकांना पदस्थापना दिली. त्यानंतर तीन दिवसांनी आता बदलीची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र या बदल्यांत आचारसंहितेत अडसर येणार असून लोकसभेनंतर बदल्यांना मुहूर्त लागणार आहे.


सम्बन्धित सामग्री