Saturday, November 02, 2024 01:42:15 PM

नांदेडमध्ये जाणवले भुकंपाचे धक्के

नांदेडमध्ये जाणवले भुकंपाचे धक्के

नांदेड, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : नांदेडमध्ये गुरूवारी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांच्या दरम्यान भूकंपचे धक्के जाणवले. ४.६ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. महाराष्ट्रामधील नांदेड, हिंगोली, परभणी या शहराजवळही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मार्च महिन्यात दुसऱ्यांदा नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालेले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही. या आधी ३ मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता १.४ रिश्टर स्केल इतक्या चे सौम्य भूकंपाची नोंद झाली होती.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo