Monday, October 14, 2024 01:23:53 AM

कांदा निर्यात बंदी, 'स्वाभिमानी संघटना' आक्रमक

कांदा निर्यात बंदी स्वाभिमानी संघटना आक्रमक

नाशिक, २३ मार्च २०२४ मार्च, प्रतिनिधी : केंद्र सरकारने ३१ मार्चनंतर कांदा निर्यात बंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यायचे असेल तर इंधन आणि गॅसचे दर कमी करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली.

अमोल कोल्हेंचे वक्तव्य

केंद्र सरकारने पुन्हा ३१ मार्चपर्यत कांदा निर्णयात बंदीचे नोटिफिकेशन काढलं आहे. याचाच अर्थ सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे असे वक्तव्य राशपचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील दिग्गज नेते जागावाटपासाठी वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायला त्यांच्याकडे वेळ नसावा, हे खरोखर दुर्देव असं म्हण खासदार कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा मी निषेध करतो. या निर्णयाने मोदी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आला आहे असा घणाघात खासदार कोल्हेंनी मोदींवर केला आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo