पुणे, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे सिंहगड महाविद्यालय परिसरात शिवसमृद्धी इमारतीजवळ मोकळ्या मैदानात टाकाऊ मालाला आग लागली असून मोठ्या प्रमाणात धूर झाला आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही.