पुणे, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा एका व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरगडे हाऊस ऑफिसच्या खाली असलेल्या रोडवर घडला. भरदिवसा गजबलेल्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.