Tuesday, December 10, 2024 11:44:59 AM

मध्य रेल्वेवर तीन दिवस पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेवर तीन दिवस पॉवर ब्लॉक

मुंबई, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटाच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून १९, २० आणि २१ एप्रिलच्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, सीएसएमटी येथून कसाराकडे जाणारी रात्री १२.१४ची लोकल अखेरची असेल. त्यानंतरच्या कर्जत व ठाणे या दोन्ही गाड्या रद्द असतील. त्यामुळे कर्जत-खोपोलीकडे प्रवाशांचे हाल होणार आहेत. जाणाऱ्या पॉवर ब्लॉकदरम्यान मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० या वेळेत सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बरवरील वडाळा या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. मेल व एक्स्प्रेस गाड्याही स्थगित असतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटाच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून १९, २० आणि २१ एप्रिलच्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, सीएसएमटी येथून कसाराकडे जाणारी रात्री १२.१४ची लोकल अखेरची असेल. त्यानंतरच्या कर्जत व ठाणे या दोन्ही गाड्या रद्द असतील. त्यामुळे कर्जत-खोपोलीकडे प्रवाशांचे हाल होणार आहेत. जाणाऱ्या पॉवर ब्लॉकदरम्यान मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० या वेळेत सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बरवरील वडाळा या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. मेल व एक्स्प्रेस गाड्याही स्थगित असतील.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo