पुणे, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास शनिवार, २० एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या १० मेपर्यंत अर्ज करता येणार आहे अशी माहिती उपकुलसचिव डॉ. एम.व्ही रासवे यांनी दिली.