Friday, December 13, 2024 12:02:56 PM

पुण्यात भल्यापहाटे अग्नितांडव

पुण्यात भल्यापहाटे अग्नितांडव

पुणे , २२ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : आज ( दि. २२) पहाटे ५च्या सुमारास पुण्यातील रविवार पेठेतील बोहरी आळी रामसुख चेंबर्स येथील शांती क्रॉकरी अँन्ड गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाला आग लागली. सादर घटनेची माहिती मिळताच ४ फायरगाड्या आणि १ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आला. अद्याप आगीचे नेमके कारण समजले नसून या घटनेत कोणीही जखमी नाही.

अचानक लागलेल्या आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचताच कृत्रिम श्वसन उपकरण परिधान करत प्रथम सदर इमारतीत किंवा दुकानामध्ये कोणी अडकले आहे का याची चाचपणी करून चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा सुरू केला.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo