मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटी वरच अवलंबून आहे. यंदा उन्हाळ्यात एसटीने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे त्याला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा उन्हाळ्यात एसटी सुसाट धावली ९० टक्के प्रवाशांनी पसंती दिली आहे. २२ एप्रिल रोजी ३१ कोटी ११लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
उन्हाळ्यानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी पुन्हा एसटीला पसंती दर्शविली आहे. २२ एप्रिलला मिळेलेले ३१ कोटींचे उत्पन्न हे गेल्या पाच महिन्यातील उचांकी उत्पन्न आहे. भाऊबिजेच्या दिवशी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यातील सर्व मार्गावर गाड्या धावल्या. या एका दिवसात महामंडळाने ३१ कोटी ६० लाखचा महसूल मिळवला मिळवला होता.
मात्र डिसेंबर महिन्यात लांब पल्ल्याचे भाडे कमी होते तसेच एसटीने हंगामी भाडेवाढ केली होती सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आलेली. ती भाडेवाढ डिसेंबरमध्ये रद्द करण्यात आली त्यामुळे पुन्हा एकदा एसटीच्या उत्पन्नात घट झाली होती. पण आता पुन्हा एकदा एसटी चांगले उत्पन्न मिळाले आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि ५० टक्के तिकीट सवलतीची महिला सन्मान योजना यामुळे यंदा एसटीला उदंड प्रवासी लाभला आहे. योग्य पद्धतीने केलेले गाड्यांचे नियोजन आणि वर्षभरात आलेल्या नवीन गाड्यांचा ताफा यामुळे बसगाड्या राज्यातील सर्व मागांवर धावल्या. या एका दिवसात महामंडळाने ३१ कोटी १० लाखचा महसूल मिळवला.