Saturday, January 18, 2025 07:09:27 AM

जायकवाडीत झपाट्याने घटः केवळ ९.८० टक्केच साठा

जायकवाडीत झपाट्याने घटः केवळ ९८० टक्केच साठा

छत्रपती संभाजीनगर , २८ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने घट होत आहे. शनिवारी साठा ९.८० टक्क्यांवर होता, तर २४ तासांपूर्वी हाच साठा १०.३० टक्के होता. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह पैठणला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊसला आपत्कालीन पंपाने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दरम्यान, मागील वर्षी याच दिवशी ५०.७८ टक्के पाणीसाठा होता. जायकवाडी धरणात गतवर्षीच्या पावसाळ्यात केवळ ४७ टक्केपाणीसाठा झाला होता. तसेच समन्यायी पद्धतीने सहा टक्के पाणीसाठा आला. त्यातून परळीला पाणीद्यावे लागले. दरम्यान, सध्याही डाव्या कालव्यातून पिण्यासाठी २ हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. यातच बाष्पीभवनाचे प्रमाण सध्या १.०७५. दलघमीपर्यंत आहे. यामुळे जायकवाडी पाणीसाठा ९ टक्क्यांवरआला असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.


सम्बन्धित सामग्री