छत्रपती संभाजीनगर, ५ मे २०२४, प्रतिनिधी: मराठवाड्यात फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा सध्या भीषण संकटाला सामोरे जावं लागत आहे. दुष्काळाच्या झळा मराठवाड्यात अधिक तीव्र झाल्या आहेत. गाव आणि वस्त्यांवर पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती समोर येत आहे.
मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पात फक्त १७.३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर या ११ प्रकल्पांपैकी ३ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्याची आकडेवारी -
जायकवाडी धरणात ८ टक्के, येलदरी धरणात ३० टक्के, सिध्देष्वर धरणात २ टक्के, माजलगांव धरणात ० टक्के, मांजरा धरणात ३ टक्के, उर्ध्व पेनगंगा धरणात ४१ टक्के, निम्न तेरणा धरणात ० टक्के, निम्न मनार धरणात २७ टक्के, विष्णुपुरी धरणात ३० टक्के, निम्न दुधना धरणात ० टक्के, सिना कोळेगांव धरणात ० टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत.