Wednesday, December 11, 2024 10:16:45 PM

अक्षय्य तृतीयेची आगळीवेगळी परंपरा

अक्षय्य तृतीयेची आगळीवेगळी परंपरा

गोंदिया, १० मे २०२४, प्रतिनिधी : अक्षय्य तृतीयेची आगळीवेगळी परंपरा गोंदिया जिल्ह्यात पाहायला मिळते. अक्षय्य तृतीयेनिमित्त गोंदिया जिल्ह्यातील माठांच्या बाजारपेठ सजल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच माठ घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. अक्षय्य तृतीयेनिमित्त शुक्रवारी नागरिक आपल्या पूर्वजांच्या स्मरणात माठांची पूजा करतात. त्यानंतर या माठात अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासून हा माठ वापरण्याची सुरवात करतात. पूर्वपार चालत आलेली ही प्रथा आजच्या काळातही गोंदिया जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. याच निमित्ताने अक्षय तृतीयेच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी करत आहेत.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo