येवला, ११ मे, २०२४ प्रतिनिधी : पाण्यासाठी लासलगाव वासियांनी कडकडीत बंद पुकारला आहे. पाणी टंचाईच्या समस्येविरोधात लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
निफाड तालुक्यातील लासलगाव शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. लासलगाव बंदच्या हाकेला नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या २० दिवसापासून लासलगाव शहरात पाणी पुरवठा झाला नाही. याच्या विरोधात लासलगाव बंदची हाक देण्यात अली. तसेच, लासलगाव वासियांकडून मतदानावर बहिष्कार घालण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.