Saturday, January 18, 2025 05:04:14 AM

पंतप्रधान मोदींची आज पुण्यात जाहीर सभा

पंतप्रधान मोदींची आज पुण्यात जाहीर सभा

पुणे, २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सध्या राज्यभरात लोकसभेसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी सोमवारी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांची आज पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रेसकोर्स मैदानावर पुणे, बारामती, शिरूर,व मावळ चार लोकसभा निवडणूक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात येणार आहे.

पंतप्रधान कराड येथून सभा संपवून संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास हेलीकॉप्टरने रेसकोर्स मैदानावर सभेसाठी दाखल होणार.या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. या जाहीर सभेसाठी सुमारे २ लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून ३५ हजार लोकांना विशेष आमंत्रण दिले आहे.दुचाकी आणि चारचाकी वाहने, बस साठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री