Thursday, December 05, 2024 05:59:40 AM

सलमान प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

सलमान प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पाचव्या आरोपीला १३ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीची पोलीस चौकशी सुरू आहे. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव रफीक चौधरी असे आहे. रफीकने गोळीबार करणाऱ्यांना भाड्याचे घर आणि दुचाकी मिळवून देण्याकरिता आर्थिक मदत केली होती. तो बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर रफिक राजस्थानला पळून गेला होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलीस यशस्वी झाले.

सलमान प्रकरणातील इतर आरोपी
लॉरेन्स बिश्नोई - तुरुंगात
अनमोल बिश्नोई - परदेशात, शोध सुरू
विक्की गुप्ता, गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत
सागर पाल, गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत
सोनू बिश्नोई, शस्त्र पुरवल्याप्रकरणी अटकेत
अनुज थापन, शस्त्र पुरवल्याप्रकरणी अटकेत


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo