Monday, February 16, 2026 11:07:56 AM

दाभोलकर हत्या, शुक्रवारी निकालाची शक्यता

दाभोलकर हत्या, शुक्रवारी निकालाची शक्यता

पुणे, ९ मे २०२४, प्रतिनिधी : नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींविरोधात सुरू असलेली सुनावणी पूर्ण झाली आहे. शुक्रवार १० मे रोजी या प्रकरणात निर्णय येण्याची शक्यता आहे.

नरेंद्र दाभोलकरांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यात हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश ए. ए. जाधव यांच्यासमोर दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. आता शुक्रवारी तब्बल दहा वर्षांनंतर दाभोलकर प्रकरणात निर्णय येण्याची शक्यता आहे.

आरोपींची नावं

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे
सचिन आंदुरे
शरद काळसकर
वकील संजीव पुनळेकर
सहाय्यक विक्रम भावे

महत्त्वाचे मुद्दे

हत्येचा तपास आठ वर्षे

खटला सुमारे अडीच वर्षे चालला


सम्बन्धित सामग्री