उस्मानाबाद, ११ मे, २०२४, प्रतिनिधी : औरंगाबाद लोकसभेच्या एका जागेसाठी एकूण ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहेत.
चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर कोणी प्रचार करताना आढळ्यास संबंधितांवर निवडणूक आयोगाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच, आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना शहरात थांबता येणार नाही आहे. याचे उल्लंघन केले तर सहा महिने शिक्षेसह दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, उमेदवारांना घरोघरी प्रचार करण्याची मुभा आहे. त्यामुळे मतदानापूर्वीचे दोन दिवस सर्वच उमेदवार आणि मतदारांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि औत्सुकतेचे ठरणार आहेत.