सिंधुदुर्ग, ११ मे, २०२४ प्रतिनिधी : प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचा अंदाजानुसार राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने ११ मे ते १४ मे या तीन दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गोवा, कोकणात पुढील दोन दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात १३ मे आणि १४ मे रोजी विजेच्या कडकटासह पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.