Wednesday, December 11, 2024 08:55:44 PM

पुण्यात रात्री खलबतं

पुण्यात रात्री खलबतं

पुणे, ११ मे, २०२४ प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात तळ ठोकून आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी रात्री उशिरा पुण्यात बैठक झाली. भाजपाचे मोठे नेते या बैठकीला उपस्थित होते.
शुक्रवारी, १० मे रोजी रात्री दीड वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मनाली जात आहे. या बैठकीस, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि भाजपा प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या बैठकीत तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, या बैठकीत आगामी टप्प्यातील मतदानाच्या दृष्टिकोनातून पक्षाचे धोरण, मतदानाची घसरलेली टक्केवारी, चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांबाबतही चर्चा करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावरून पुण्याचा गाद राखण्यासाठी भाजपने कंबर कसलेली दिसत आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo