Thursday, December 05, 2024 05:57:15 AM

चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला

चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला

मुंबई, ११ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी थांबला. प्रचारात सर्वपक्षीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी सभा, प्रचार फेऱ्या यावर भर दिला. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी १३ मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात दहा राज्यांतील ९६ जागांवर मतदान होणार आहे. एकूण १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सोमवार १३ मे २०२४ रोजी ११ जागांवर मतदान

नंदुरबार - हिना गावित, भाजपा विरुद्ध गोवाल पाडवी, काँग्रेस विरुद्ध हनुमंत सूर्यवंशी, वंचित
जळगाव - स्मिता वाघ, भाजपा विरुद्ध करण पवार, शिउबाठा विरुद्ध प्रफुल लोढा, वंचित
रावेर - रक्षा खडसे, भाजपा विरुद्ध श्रीराम पाटील, राशप विरुद्ध संजय ब्राह्मणे, वंचित
जालना - रावसाहेब दानवे पाटील, भाजपा विरुद्ध कल्याण काळे, काँग्रेस विरुद्ध प्रभाकर बकले, वंचित
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) - संदीपान भूमरे, शिवसेना विरुद्ध चंद्रकांत खैरे, शिउबाठा विरुद्ध, अफसर खान, वंचित विरुद्ध इम्तियाज जलील, एमआयएम
मावळ - श्रीरंग बारणे, शिवसेना, संजोग वाघेरे पाटील, शिउबाठा
पुणे - मुरलीधर मोहोळ, भाजपा विरुद्ध रवींद्र धंगेकर, काँग्रेस विरुद्ध वसंत मोरे, वंचित
शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अमोल कोल्हे, राशप
अहमदनगर - सुजय विखे पाटील, भाजपा विरुद्ध निलेश लंके, राशप
शिर्डी - सदाशिव लोखंडे, शिवसेना विरुद्ध भाऊसाहेब वाघचौरे, शिउबाठा विरुद्ध अशोक आल्हाट, ओबीसी बहुजन विरुद्ध उत्कर्षा रुपवते, वंचित
बीड - पंकजा मुंडे, बीड, भाजपा विरुद्ध बजरंग सोनावणे, राशप

कोणत्या राज्यातील किती जागांवर मतदान ?

आंध्र प्रदेश - २५ जागा
तेलंगण - १७ जागा
उत्तर प्रदेश - १३ जागा
महाराष्ट्र - ११ जागा
मध्य प्रदेश - ८ जागा
पश्चिम बंगाल - ८ जागा
बिहार - ५ जागा
झारखंड - ४ जागा
ओडिशा - ४ जागा
जम्मू काश्मीर - १ जागा

आंध्र प्रदेश : अराकू (एसटी), श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ली, काकीनाडा, अमलापुरम (एससी), राजमुंद्री, नरसापुरम, एलुरु, मछलीपट्टणम, विजयवाडा, गुंटूर, नरसराओपेट, बापटला (एससी), ओंगोल, नंद्याल, कुरन तिरुपती (SC), राजमपेट, चित्तूर (SC)

तेलंगण : आदिलाबाद (ST), पेड्डापल्ली (SC), करीमनगर, निजामाबाद, जहिराबाद, मेडक, मलकाजगिरी, सिकंदराबाद, हैदराबाद, चेवेल्ला, महबूबनगर, नालगोंडा, नागरकुर्नूल (SC), भुवनगिरी, वारंगल (SC), महबूबाबाद (ST), खम्मम

उत्तर प्रदेश: शाहजहानपूर, खेरी, धरुहरा, सीतापूर, हरदोई, मिस्रिख, उन्नाव, फारुखाबाद, इटावा, कन्नौज, कानपूर, अकबरपूर, बहराइच (SC)

महाराष्ट्र: नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

मध्य प्रदेश: देवास, उज्जैन, मंदसूर, रतलाम, धार, इंदूर, खरगोन, खंडवा

पश्चिम बंगाल: बहरामपूर, कृष्णनगर, राणाघाट, वर्धमान पूर्वा, बर्दवान-दुर्गापूर, आसनसोल, बोलपूर, बीरभूम

बिहार: दरभंगा, उजियारपूर, समस्तीपूर, बेगुसराय, मुंगेर

झारखंड: सिंगभूम, खुंटी, लोहरदगा, पलामौ

ओडिशा: कालाहंडी, नबरंगपूर (ST), बेरहामपूर, कोरापुट (ST)

जम्मू आणि काश्मीर: श्रीनगर

प्रमुख उमेदवारांची यादी

अखिलेश यादव, समाजवादी पक्ष : कन्नौज, उत्तर प्रदेश

महुआ मोईत्रा, तृणमूल काँग्रेस : कृष्णनगर, पश्चिम बंगाल

गिरीराज सिंह, भाजपा : बेगुसराय, बिहार

वायएस शर्मिला, काँग्रेस : कडप्पा, आंध्र प्रदेश

अर्जुन मुंडा, भाजपा : खुंटी, झारखंड

शत्रुघ्न सिन्हा, तृणमूल काँग्रेस : आसनसोल, पश्चिम बंगाल

माधवी लता, भाजपा: हैदराबाद, तेलंगण


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo