Monday, February 17, 2025 02:01:32 PM

Nashik
नाशिक अपघातातील मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत

नाशिक-मुंबई महामार्गावरील द्वारका चौकाजवळ 13 जानेवारी 2025रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातातील 9 मृतांच्या वारसांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले.

नाशिक अपघातातील मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत


मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गावरील द्वारका चौकाजवळ 13 जानेवारी 2025 रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातातील 9 मृतांच्या वारसांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीची एकूण रक्कम 45 लाख रुपये असून ती नाशिक जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 

13 जानेवारी रोजी नाशिकच्या द्वारका चौकातील उड्डाणपुलावर लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून भरधाव टेम्पोने धडक दिल्याने 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली. त्यानुसार मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून मदतीची एकूण 45 लाख इतकी रक्कम जिल्हाधिकारी नाशिक यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

मृतांच्या वारसांना मंजूर करण्यात आलेल्या 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य अतुल मंडलिक, अनुज घरटे, आरमान शाहरुख खान, यश उर्फ शिवम चंद्रकांत खरात, चेतन उर्फ चारुदत्त दिनेश पवार, राहुल प्रभाकर साबळे, विद्यानंद समाधान कांबळे, दर्शन सुनिल घरटे, संतोष तुकाराम मंडलिक या नऊ मृतांच्या वारसांना देण्यात आले आहे. 

हेही वाचा : Cabinet Decision: अटल सेतूवर सवलतीच्या दराने आणखी एक वर्षभर पथकर आकारणी होणार
 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा अपघात प्रकरणात जखमी तसेच मृतांच्या वारसांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने आतापर्यंत हजारो गरजू रुग्ण आणि अपघातग्रस्तांना मदत करून दिलासा दिला आहे. भविष्यातही गरजूंसाठी हा कक्ष मदतीचा हात ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख नाईक यांनी व्यक्त केला आहे.


सम्बन्धित सामग्री