अमरावती : अमरावती जिल्ह्यातील रेहट्याखेडा गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. जादूटोण्याच्या संशयावरून 77 वर्षीय वृद्ध महिलेची गावात धिंड काढली आहे. महिलेची धिंड काढताना संपूर्ण गावाने बघ्याची भूमिका घेतली. तर पोलिसांकडून केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
77 वर्षीय वृद्ध महिलेची गावात धिंड काढली. जादूटोण्याच्या संशयावरून हा प्रकार घडला. मात्र आरोपीवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नाही असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल व त्यानंतर जादूटोणा संदर्भात गुन्हे लावले जातील असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले.
हेही वाचा : एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5 हजार लालपरी बसेस खरेदी करणार
नेमकं प्रकरण काय?
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा गावात 77 वर्षीय वृद्ध महिलेची धिंड काढली. महिलेने या प्रकाराविरोधात चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मात्र केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. गावात या वृद्ध महिलेला मारहाण झाली. पोलिसांनी मारहाण झाली म्हणून गुन्हा दाखल केला. अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल झाला नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.दरम्यान या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे.