Friday, April 25, 2025 09:50:36 PM

Digital Arrest: 'मी CBI अधिकारी बोलत आहे!' 'डिजिटल अरेस्ट'द्वारे मुंबईतील 86 वर्षीय महिलेची 20 कोटी रुपयांची फसवणूक

फसवणूक करणाऱ्यांपैकी एकाने महिलेकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःला 'CBI अधिकारी' म्हणून ओळख करून दिली होती. 26 डिसेंबर 2024 ते यावर्षी 3 मार्च दरम्यान झालेल्या या गुन्ह्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली.

digital arrest मी cbi अधिकारी बोलत आहे डिजिटल अरेस्टद्वारे मुंबईतील 86 वर्षीय महिलेची 20 कोटी रुपयांची फसवणूक
Digital Arrest
Edited Image

Digital Arrest: मुंबईत राहणाऱ्या एका 86 वर्षीय महिलेची 'डिजिटल अरेस्ट' फसवणुकीमुळे दोन महिन्यांत 20 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली. यासंदर्भात अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फसवणूक करणाऱ्यांपैकी एकाने महिलेकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःला 'सीबीआय अधिकारी' म्हणून ओळख करून दिली होती. 26 डिसेंबर 2024 ते यावर्षी 3 मार्च दरम्यान झालेल्या या गुन्ह्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

सायबर गुन्हेगार दर 3 तासांनी तपासत असतं महिलेचे लोकेशन - 

आरोपींनी वृद्ध महिलेला 2 महिने घरी राहण्यास भाग पाडले आणि दर तीन तासांनी तिला फोन करून तिचे ठिकाण जाणून घेत राहिले. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले गेले होते, त्यांची ओळख पटवून सायबर पोलिसांनी महिलेला 77 लाख रुपये काढण्यापासून रोखले. या महिन्याच्या सुरुवातीला महिलेने दाखल केलेल्या पोलिस तक्रारीनुसार, तिला सीबीआय अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका पुरूषाचा फोन आला आणि त्याने तिला सांगितले की तिच्या 'आधार' कार्डचा वापर करून बँक खाते उघडण्यात आले असून ते मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरले जात आहे.

हेही वाचा - ट्रायचा 116 कोटी मोबाईल वापरकर्त्यांना इशारा; चुकूनही करू नका ''हे'' काम

दरम्यान, यानंतर त्या पुरुषाने महिलेला सांगितले की सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि तिने तिच्या खोलीत राहावे. त्याने महिलेला 'डिजिटल अटक' करण्याची धमकीही दिली. ऐवढचं नाही तर आरोपीने महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना अटक करण्याची देखील धमकी दिली. 26 डिसेंबर ते 3 मार्च या कालावधीत, वृद्ध महिलेने आरोपींना 20 कोटींहून अधिक रुपये हस्तांतरित केले. 

हेही वाचा - व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी मोठा धोका! RBI ने जारी केला इशारा

भारतातील सर्वात मोठे डिजिटल अटक प्रकरण - 

तथापि, हे प्रकरण भारतातील सर्वात मोठे डिजिटल अटक घोटाळा असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या टोळीचा भाग आहे. आरोपींनी टेलिग्राम अॅपवर एक ग्रुप तयार केला होता ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे असलेल्या भारतीय खात्यांची माहिती शेअर केली जात होती. आरोपी भविष्यातही भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्याचा कट रचत होते.
 


सम्बन्धित सामग्री