महाराष्ट्र: माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा
हे तर लहानपणीच आपण सर्वांनी वाचलं असेल. सद्या सर्वच पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवता,यामुळे आताच्या पिढीला मराठी बोलण्याचं थोडी अडचणच होते असं बोललं तरी ते वावगं ठरणार नाही. अनेक शाळेंमध्ये मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जाते परंतु आता याच पार्शवभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता मराठी शिकवणं सर्व शाळेंमध्ये बंधनकारक असणारे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिलीय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणाले मंत्री दादा भुसे?
“केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य आहे. यातून त्यांना कोणतीही पळवाट काढता येणार नाही. याबरोबरच मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे”, अशी सूचना दादा भुसे यांनी दिली आहे.
त्याचबरोबर दादा भुसे यांनी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा संस्थाचालक संघटना यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी शालेय शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा, यासाठीचे सर्वंकष धोरण आणले जाणार आहे. येत्या आठ दिवसात शालेय शिक्षण विभागाच्या धोरणाचा रोड मॅप समोर आणला जाईल. शालेय शिक्षण विकासाचा एक दशसूत्री कार्यक्रम जाहीर करून तो राबवला जाईल, असे देखील दादा भुसे म्हणालेत.
तसेच, “मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर शालेय शिक्षण विभागाची करडी नजर असणार आहे. ज्या शाळा मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करत असतील, त्याची तक्रार पालकांना करता येणार आहे. तसेच या अशा शाळांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे” असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणालेत.