Sunday, February 16, 2025 12:01:34 PM

BJP
भाजपाकडून सरकारी कामांसाठी नवा पायंडा

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. सरकारकडून सामान्य कार्यकर्त्यांची कामे होणं आवश्यक आहे.

भाजपाकडून सरकारी कामांसाठी नवा पायंडा

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. सरकारकडून सामान्य कार्यकर्त्यांची कामे होणं आवश्यक आहे.  त्याकरिता पक्षाकडून प्रत्येक मंत्री महोदयांकडे एक स्वीय सहाय्यक हा पक्षाच्या कामासाठी ‘समन्वयक’ म्हणून नियुक्त केला जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आदेश काढलेले आहेत. तसेच महाराष्ट्र भाजपतर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रही त्यांनी प्रसिद्ध केलंय.  

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय आहे प्रकरण? 
पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कामे सरकारमार्फत होणं आवश्यक आहे. सरकार आणि पक्ष यात मध्यस्थी म्हणून काम करण्यासाठी समन्वयक नेमण्याची मागणी होती. प्रत्येक मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी 'समन्वयक' नियुक्त केला जाणार आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याकरिता विशेषत्वाने पक्षाकडून समन्वयकाची नियुक्ती केली जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र जारी केले आहे. महाराष्ट्र भाजप तर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देऊळगावकर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहायक आठवड्यातून 2 दिवस मुख्य समन्वयक प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. 

हेही वाचा : शिंदेंची सेना फुटीच्या मार्गावर?
 

भाजपच्या या निर्णयानंतर महायुतीतील अन्य दोन घटक पक्ष काय निर्णय घेतात, यावर राजकारण रंगतंय का? सरकारच्या कामात हस्तक्षेप होत असल्याची ओरड विरोधक करणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 


सम्बन्धित सामग्री