नाशिक : नाशिक जिल्ह्यात गवळाने गावात प्लास्टिकच्या कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले आहे. तब्बल ५ तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. आग आटोक्यात आल्याने परिसरातील घर थोडक्यात बचावले आहे. अग्निशमन दलाच्या ११ गाड्यांचा आग विझवण्यासाठी वापर करण्यात आला आहे.