सातारा : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा येथील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. तसेच पुण्यातील प्रभात रोड येथे एका इमारतीतही छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रघुनाथराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आणि गोविंद दूध डेअरी वर धाड टाकली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तसेच गोविंद दूध डेअरीवरही आयकर विभागाने धाड टाकली आहे. एकाचवेळी पुणे, मुंबई आणि फलटण येथील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे. विविध ठिकाणच्या आर्थिक व्यवहाराबाबत अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा : शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा- छगन भुजबळ
संजीवराजे निंबाळकरांचे कार्यकर्ते आक्रमक
आयकर विभागाने केलेल्या छापमारीनंतर संजीवराजे निंबाळकरांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आयकर विभागाने केलेल्या छापेमारीचा निषेध त्यांच्याकडून करण्यात येत आहे. संजीवराजे निंबाळकरांच्या फलटण आणि पुण्यातील घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तसेच गोविंद मिल्क प्रकल्पाचीही चौकशी सुरु आहे. राजकीय आकसापोटी कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर निवडणुकीआधी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.
हेही वाचा : फॅक्ट चेक: मसालेदार चिकन-मटण खाल्ल्यावर हृदयविकाराचा झटका? तज्ज्ञांचे स्पष्टीकरण!
आयकर विभागाच्या कारवाईचा चव्हाणांकडून निषेध
रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्या फलटण आणि पुणे येथील निवासस्थानी आज आयकर विभागाचे छापे पडले आहेत. त्यासह त्यांच्या गोविंद मिल्क या प्रकल्पवरही आयकर विभागाचे पथक चौकशी करत आहे. आयकर विभागाच्या छाप्यानंतर संजीवराजे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून या कारवाईवर फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आयकर विभागाच्या कारवाईचा चव्हाण यांनी निषेध केला असून राजकीय आकस बाळगून ही कारवाई होत असल्याचा आरोप माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केला आहे.