Monday, March 17, 2025 05:06:17 PM

बाजारात बिबट्याच्या संरक्षणसाठी अनोखे यंत्र, बिबटे झाले सैरभैर...

आता बाजारपेठेमध्ये बिबट्याला पळवून लावण्याकरिता एक रामबाण उपाय आला आहे

 बाजारात बिबट्याच्या संरक्षणसाठी अनोखे यंत्र बिबटे झाले सैरभैर



महाराष्ट्र : अनेक ठिकाणी गावाकडच्या परिसरात  बिबट्याचा वावर वाढला आहे. दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये बिबट्या पाळीव प्राण्यावर व माणसांवर हल्ला करुन ठार केल्याच्या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात.याच बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या उपाययोजना करत असत जसं, काहीजण गोठ्याला व घरांना उंच लोखंडी जाळी लावत आहे, काहीजण घराच्या सर्व बाजूंना प्रखर विजेचे दिवे लावत आहेत. उजेडामुळे बिबट्या जवळ येणार नाही, बिबट्याचा शेतात गुरगुरण्याचा आवाज आल्यावर मोठ्या आवाजाचे फटाके वाजवून बिबट्याला पळवून लावत आहेत. पण तरीही त्यांचा वावर कमी होताना दिसत नाही. 

यामुळे कित्येक गावात नागरिकांचं बाहेर येणं कठीण होऊन बसलं होतं कारण  दिवस असो वा रात्र कधीही या बिबट्यांचं आगमन होताना दिसायचं आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हायचं. आणि यामुळे समाजमाध्यमांवर वारंवार बातम्या ऐकतो  बिबट्याने महिलेवर हल्ला केला, लहान बालकांवर हल्ला केला हल्ला केला अशावेळी ताबोडतोब उपचार न मिळाल्यास उपचारादरम्यान  कोणाचा मृत्यही होण्याची शक्यता असते.  बिबट्याने मनुष्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. बिबट्यापासून पाळीव जनावरांचे संरक्षण करण्यासाठी किंवा बिबट्याला पळवून लावण्यासाठी नागरिक विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहे. 

अशातच ,आता बाजारपेठेमध्ये बिबट्याला पळवून लावण्याकरिता एक रामबाण उपाय आला आहे ज्यात कॉर्पेट (फळे पिकवण्यासाठी किंवा गॅस वेल्डींगसाठी वापरण्यात येणारे कॉर्पेट) व पाणी टाकुन गॅस लायटरच्या साह्याने रासायनिक प्रक्रीया घडवून स्फोट केला असता मोठा फटाक्यासारखा आवाज होतो या आवाजाने बिबट्या दूर पळून जातो या बनविलेल्या "देशी जुगाड" च्या तोफेला चांगली मागणी वाढली आहे. गावांमध्ये जाऊन या तोफेचे प्रात्यक्षिक दाखवून विक्री करत आहेत. दररोज सुमारे 50 ते 60 तोफेंची विक्री होत असून, एक तोफ 200 ते 250 रुपयांना विकली जात असल्याचे विक्रेते सांगतात.


सम्बन्धित सामग्री