Sunday, March 16, 2025 09:22:16 AM

आदित्य ठाकरेंकडून दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी; भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची जोरदार टीका

भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरेंकडून दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची जोरदार टीका

मुंबई : सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावरून भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावरून चित्रा वाघ यांनी त्यांच्या आजोबांना नेते 'मातोश्री'वर भेटायला यायचे. बाळासाहेबांचा नातू दिल्लीत चरणस्पर्श करतो असा निशाणा त्यांनी आदित्य ठाकरेंवर साधला आहे. तसेच आदित्य ठाकरेंकडून दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी चालू आहे. हा मराठी अस्मितेचा अपमान नाही का? असा सवालही यावेळी चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट पोस्टच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना लक्ष केले आहे. 

हेही वाचा : चंद्रपूर जिल्हा बँकेवर सायबर हल्ला, 3.70 कोटी रुपयांचा अपहार
 

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांन केलेली पोस्ट 

ज्यांच्या आजोबांना नेते 'मातोश्री'वर भेटायला यायचे, त्यांचा नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय..! मराठी अस्मितेचा हा अपमान नाही का..?

संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात, पण आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतल्या हुजरेगिरीवर गप्प का? की यावरही काहीतरी चमत्कारिक स्पष्टीकरण येणार का..!

आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत! 
महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श–हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा..? 

आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!


चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंसोबतच संजय राऊतांनाही लक्ष केले आहे. संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात. परंतु आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतील हुजरेगिरीवर गप्प का असा प्रश्न त्यांनी राऊतांना केला आहे. आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत. महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श–हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा असं म्हणत त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरही जोरदार टीका केली आहे. 


सम्बन्धित सामग्री