नेतेमंडळी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं हे वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरतोय. एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही, सरकार एक रुपयात पिकविमा देतं, एक रुपयात पीकविमा योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय.
हेही वाचा: अभ्यासक्रमात क्रिकेटचा समावेश होणार
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
विचार केला तर भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही मात्र एक रुपयांमध्ये पिक विमा दिला. मात्र त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला. असा गैरप्रकार केला की बाकी राज्यातील लोकांनी देखील ऑनलाईन अर्ज केले. त्यातून असं वाटते की ही पिक विमा खूपच चांगली आहे की काय आम्ही जेव्हा चौकशी केली. त्यातून सत्य कळल्यानंतर आम्ही अर्ज नामंजूर केले असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. पिक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे योग्य त्या शेतकऱ्याला ती योजना मिळाली पाहिजे. यातले फायदे-तोटे हे चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर एक रुपयात पीकविमा योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला, गैरव्यवहार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले असून कृषी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असून नवीन भरतीसंदर्भात सरकार विचार करेल अशी माहिती ही कोकाटेंनी दिलीय. त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपर्क साधण्यासाठी अधिकाऱ्यांना सीरियल नंबर देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.